Ad will apear here
Next
रत्नागिरीत ‘स्वराभिषेक’तर्फे दिवाळी पहाट
रत्नागिरी : शहरातील स्वराभिषेक आणि जयेश मंगल पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने सात नोव्हेंबर २०१८ रोजी दिवाळी पहाटे साडेपाच वाजता जयेश मंगल पार्क येथे सुरेल मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वराभिषेक आणि जयेश मंगल पार्कचे दिवाळी पहाट मैफलीचे हे तिसरे वर्ष असून, स्वराभिषेकच्या विनया परब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा शिष्यवर्ग शास्त्रीय गायनासोबतच, मराठी-हिंदी भावगीते, नाट्यगीते, भक्तिगीतांची खमंग मेजवानी रसिकांना मिळणार आहे. या मैफलीसाठी महेश दामले (संवादिनी), केदार लिंगायत (तबला), मंगेश चव्हाण (पखवाज-ढोलकी), अद्वैत मोरे (तालवाद्य) आणि मंगेश मोरे (सिंथेसायझर) हे संगीतसाथ करतील.

‘मैफलीच्या यशस्वीतेसाठी ‘स्वराभिषेक’ची सर्व टीम मेहनत घेत असून, मैफलीचा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आस्वाद घ्यावा,’ असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

मैफलीविषयी :
दिवस : बुधवार, सात नोव्हेंबर २०१८
वेळ : पहाटे ५.३० वाजता
स्थळ : जयेश मंगल पार्क, माळनाका, रत्नागिरी
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZWFBU
Similar Posts
दिवाळीच्या पहाटे रत्नागिरीत ‘स्वराभिषेक’ रत्नागिरी : लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचे औचित्य साधून रत्नागिरीतील स्वराभिषेक संस्थेच्या कलाकारांनी सात नोव्हेंबर २०१८ रोजी पहाटे शास्त्रीय आणि सुगम गीतांची मैफल रंगवली. त्यामुळे दिवाळीच्या पहाटे रत्नागिरीकर रसिकांवर जणू ‘स्वराभिषेक’च झाला. सुंदर संगीताच्या जोडीला रांगोळ्या आणि दिव्यांच्या रोषणाईने सजलेला
‘आषाढी’निमित्त रत्नागिरीत गीत, नृत्य, रंगांचा त्रिवेणी संगम पंढरी पाहिला’ हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. यात गायन, नृत्य आणि रंगांचा त्रिवेणी संगम साधण्यात आला आहे. हा कार्यक्रम २३ जुलै २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता शहरातील जयेश मंगल पार्क येथे आयोजित करण्यात आला आहे.
गीत-नृत्य-रंगांच्या आविष्कारात विठ्ठल साकारला रत्नागिरी : ‘स्वराभिषेक’च्या मुलांनी सादर केलेली एकापेक्षा एक समधुर भक्तिगीते, या गीतांना ‘साईश्री’च्या विद्यार्थ्यांनी चढवलेली नृत्याची साज आणि साथीला मधुरा लाकडे यांच्या कुंचल्यातून साकारलेला साक्षात श्री विठोबा यामुळे आषाढी एकादशीच्या रत्नागिरी भक्तीत न्हाऊन निघाली.
आशा खाडिलकर यांच्या मैफलींची मेजवानी रत्नागिरी : गायन कारकीर्दीची पन्नास वर्षे पूर्ण केलेल्या गायिका आशा खाडिलकर यांच्या ‘स्वरदीपोत्सव’ या दिवाळी पहाट मैफलींचे आयोजन चतुरंग प्रतिष्ठानने रत्नागिरी आणि चिपळूण येथे केले आहे. त्यामुळे कोकणातील रसिकांना ऐन दिवाळीत अभंग, नाट्यसंगीत, भक्ती अशी गानफराळाची मेजवानी मिळणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language